Spread the love

पिंपरी : प्रतिनिधी

IPA राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस ऑनलाइन स्पर्धा 2024 मध्ये अयांशी भारद्वाज हिने ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ पुरस्कार पटकावल्याबद्दल तिचा सन्मान व सत्कार मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आला.

कविता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयडियल प्ले अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड पिंपळे सौदागर येथे अयांशी भारद्वाज अबॅकसचे शिक्षण घेत असून या स्पर्ध्ये दरम्यान तिने कमीत कमी 100 गणिताच्या समस्या पूर्ण केल्या आहेत. तसेच २०२४ या वर्षाच्या अखेरीस मलेशियामध्ये होणाऱ्या IPA विश्वचषक अबॅकस चॅम्पियनशिप स्पर्धा घेणार असून त्यात देखील तिची निवड झाली आहे त्यासाठी देखील तिला शुभेच्छा देण्यात आल्या. अबॅकस COC हा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ पुरस्कार म्हणजे. या स्पर्ध्येमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या आणि प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या सहभागींपेक्षा वरच्या आणि त्यापलीकडे असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट सहभागीला हा पुरस्कार दिला जातो.या स्पर्धेत एकूण २० हजार व अधिक विध्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.यामध्ये दुबई, ऑस्ट्रेलिया, इतर देशातील विध्यार्थी देखील सहभागी झाले होते, या सर्वातून तिने हा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ पुरस्कार पटकवला असून अयांशी ने यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये देखील आयपीए राज्यस्तरीय ॲबॅकस ऑनलाइन चॅम्पियनशिपमध्येही प्रथम क्रमांक मिळविला होता.अयांशीच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी तिला नाना काटे यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या, या सत्कारावेळी आयांशीचे पालक, शिक्षक, व सोसायटी मधील पाधादिकारी देखील उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *