Spread the love

उमरगा : माऊली इंटरनॅशनल सि बी एस इ स्कुल कोरेगाव रोड उमरगा येथे दि 12 जानेवारी 2024 वार शुक्रवार रोजी स्वामी विवेकानंद व जिजामाता भोसले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम शाळेच्या प्राचार्या तथा संस्थेच्या अध्यक्षा प्रा मंगला शिंदे मॅडम व शाळेचे उपमुख्याध्यापक श्रीशैल मुलगे सर,यांनी प्रतिमेचे पूजन केले.त्यानंतर श्री दिलीप चव्हाण सर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ भोसले यांच्या जीवनावर खूप छान भाषणे केले. तसेच अनेक विद्यार्थी स्वामी विवेकानंद आणि राष्टमाता जिजाऊ यांच्या वेशभूषामध्ये विद्यार्थी हजर होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भाग्यरथी वाघमारे मॅडमने केले. सौ सुजाता जाधव मॅडम यांनी राष्ट्रमाता जिजाऊ बद्दल माहिती सांगितली आणि ईश्वर सोंनकवडे सर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री विजय सगर सर यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. सर्व शिक्षक ईतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *